Panchkarma

पंचकर्म म्हणजे काय?
पंचकर्म ही आयुर्वेदाची एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली ही उपचार पद्धती आहे. यामध्ये रोग बरा करण्यासाठी एखादे औषध देऊन शरीरातच तो रोग जिरवून न टाकता तो रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे रोग समूळ नष्ट होतो. अर्थात तो रोग पुन्हा डोके वर काढत नाही व रोग समूळ नष्ट होतो. अशा रीतीने रोग शरीरातून बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेला शोधन क्रिया म्हटले जाते. मात्र त्याचबरोबरच बृहन, लंघन, स्नेहन, रुक्षण, स्वेदन व स्तंभन हे सहा उपक्रमही केले जातात. परंतु पंचकर्म उपचारात वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण हे प्रमुख व अत्यंत महत्त्वाचे असे उपचार आहेत.
प्रत्येक रुग्णाला हे पाचही उपचार केलेच पाहिजे, असे आवश्यक नाही. रुग्णाची प्रकृती, आतापर्यंत झालेली मोठमोठी आजारपणे, वय, कुठला ऋतू सुरू आहे या सर्वांचा विचार करून वैद्य रुग्णाला नेमका कुठला उपचार द्यायचा हे ठरवितात. पंचकर्मामध्ये वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे शोधन करायचे असते.
वात, पित्त व कफ हे तीन दोष संतुलित असतील तर कोणताही रोग होत नाही. मात्र यांच्यापैकी एखादाही दोष वाढला असेल तर, शरीरात रोग निर्माण होत असतो. हे तीन दोष वाढण्याच्यादेखील वेगवेगळ्या श्रेणी असतात. त्यानुसार उपचार निश्चित केला जातो. साधारणतः अन्न पचन न होणे, तोंडाला चव नसणे, स्थूलपणा, ऍनिमिया, जडत्व, अंग गळून जाणे, अंगावर पित्त उठणे, सर्वांगास कंप सुटणे, सर्व अंग जखडणे, कामात लक्ष न लागणे, अतिशय आळस येणे, थोडे श्रम करताच दम लागणे, अकारण अशक्तपणा येणे, सर्वांगास दुर्गंधी येणे, वारंवार कफ होणे, वारंवार पित्त होणे, निद्रानाश किंवा अतिशय झोप येणे, नपुंसकता येणे, वाईट स्वप्ने पडणे, शरीराचा वर्ण काळवंडणे ही लक्षणे दिसलीत तर पंचकर्म उपचार देणे अतिशय लाभकारक असते.
पंचकर्म उपचार करताना रोग्याची शक्ती पाहिली जाते. हे उपचार सोसण्याची ताकद रुग्णामध्ये असली पाहिजे. वात, कफ व पित्त हे तीन दोष शरीरात वाढले असतील. सर्व शरीरात पसरले असतील व ते साम अवस्थेत असतील तर ते दोष वाढलेले असूनदेखील पंचकर्माद्वारे तसेच्या तसे बाहेर काढता येत नाहीत. साम अवस्थेतील रोग्याचे शोधन केल्यास रोग्याला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पाचन, स्नेहन व स्वेदन हे तीन पूर्व उपचार केले जातात व तद्नंतर पंचकर्म उपचार केले जातात.
पंचकर्म उपचार पध्दती
चयापचय क्रिया व आहार जडीबुटीच्या औषधाद्वारे वाढविण्याची शुध्दीकरण प्रक्रिया म्हणजे पंचकर्म होय आणि अती जुनाट आजारामध्ये याचा वापर होतो. शब्दशः याचा अर्थ पंच म्हणजे कर्म कृती असा आहे. म्हणून पंचकर्म म्हणजे ५ प्रकारची तंत्रे किंवा उपचार होय.
पंचकर्म उपचार हे हेमीपोजिया, पोलियो, संधीवात, त्वचेचे आजार, डयूओडेनल अल्सर, अल्सेरटिव्ह कोलायटिस, आणि दमा यामध्ये खुप उपयोगी ठरतात.
पंचकर्मात वापरल्या जाणाऱ्या ५ उपचार पध्दती
१. वमन:
वांतिकारक औषधांचा वापर – कफ दोषामुळे होणाऱ्या तीव्र आजारामध्ये ही पध्दत वापरली जाते. यामध्ये नियंत्रित उलट्या – ओकाऱ्या औषधांच्या सहाय्याने निर्माण केल्या जातात. याचा वापर उपयोग जुनाट दमा, तीव्र पित्त, यामध्ये केला जातो. वमन हे लहान तसेच वृध्द किंवा गरोदर स्त्रीयांना देउ नये. तसेच ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली द्यावे.
रेचकाचा वापर: पित्त दोषामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र आजारामध्ये ही पध्दत वापरली जाते. काविळ, जंत व कृमी यामध्ये ही पध्दत वापरली जाते. लहान मुले, वृध्द किंवा गरोदर स्त्रीयांना विरेचन देउ नये. तसेच ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली द्यावे.
२. विरेचन:
३. बस्ती:
औषधी – एनेमा – बस्ती – यात वापरली जाणारी औषधे ही काढा, शुध्द तेले, दुध इत्यादी असु शकतात. संधीवात, पाठदुखी इत्यादी मध्ये याचा वापर होतो. बस्ती ही लहान मुले, वृध्द, गरोदर स्त्रीया यांना देउ नये. तसेच ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली द्यावी.
नस्य हे नाकाद्वारे दिले जाते. औषधी चुर्ण, काढा किंवा तेलाचे थेंब हे नाकपुडितुन दिले जातात. ते डोके व मानेच्या भागातुन शिल्लक राहीलेले दोष व विषारी द्रव्ये काढुन टाकतात. मायग्रेन अपस्मार इत्यादी मध्ये नस्य वापरले जाते.
४. नस्य: नाकावाटे दिली जाणारी औषधे
५. रक्त मोक्षनाः रक्त काढणे:
 
दोन प्रकारे केले जाते
1) शीर कापुन
2) जळु लावुन
याचा मुख्यत्वे वापर, रक्तदोष व त्वचेचे आजार, हत्ती रोग इत्यादी मधे केला जातो. रक्त मोक्षन हे लहान मुले, वृध्द, गरोदर स्त्रीया यांना देउ नये. तसेच ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली द्यावे.
पंचकर्म उपचारात विशिष्ठ आहार पध्दती वापरली पाहीजे ज्यामध्ये खिचडी चा समावेश असावा